Headlines

Latest posts

All
fashion
lifestyle
sports
tech

पाळधी गावातील मुख्य बस स्थानक गाड्यांचा वेग कमी करण्यासाठी रबर स्ट्रीप,रमबल्स किंव्हा गतिरोधक सारखी यंत्रणा बसविण्याबाबत ग्रामस्थांचे पहूर पोलिसात निवेदन.

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting…

Latest Youtube

Popular

शेंदुर्णीच्या नगराध्यक्षपदी भाजपचे गोविंद अग्रवाल ६११ मतांनी विजयी…महा विकास आघाडीने दिली जोरदार लढत,…
पाळधी गावात मध्यरात्री दुचाकी चोरी व घरफोडीची घटना;पहूर पोलिसांकडून तपास सुरू.गावातील तिसरा डोळा ठरतोय का शोपिस,नागरिकांमध्ये चर्चा.
तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकांचा पीककर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा,तर बँकांकडून पीककर्ज थकलेल्या शेतकऱ्यांचे बचत खात्याला होल्ड.
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय जामनेर येथे संविधान दिन उत्साहात साजरा.

नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा

पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.

Read More

शेंदुर्णीच्या नगराध्यक्षपदी भाजपचे गोविंद अग्रवाल ६११ मतांनी विजयी…महा विकास आघाडीने दिली जोरदार लढत,…

शेंदुर्णी ( ता.जामनेर ) शेंदुर्णी नगरपंचायती साठी झालेल्या निवडणुकीच्या आजच्या निकालात भाजपने हॅड्रीक करत सलग तिसऱ्यांदा आपली एकहाती सत्ता स्थापन केली असुन महाविकास आघाडीने सुद्धा जोरदार लढत दिली .भाजपा चे अधिकृत ८ नगरसेवक विजयी झाले असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ४, इंदिरा कॉंग्रेस चे २ तर अपक्ष ३ नगर सेवक विजयी झालेअसून यामध्ये१ नगरसेवक भाजप पुरस्कृत तर १ नगरसेवक आधीच बिनविरोध झाला असून त्यांनी भाजपाला पाठींबा दिला आहे. शेंदुर्णी नगरपंचायत मध्ये २०४५३ एकुण मतदान होते यापैकी १४२९३ म्हणजे ६९.८८ टक्के मतदान झाले होते.नगराध्यक्षपदासाठी मुख्य लढत भाजपचे ज्येष्ठ नेते गोविंद अग्रवाल व महाविकास आघाडीच्या वतीने सौ.उज्वला काशिद यांच्या मध्ये थेट झाली.२ अपक्ष उमेदवार सुद्धा रिंगणात होते.नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार गोविंदअग्रवाल यांना ७१७० तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ.उज्वला काशिद यांना ६५५९ मते मिळाली असुन गोविंद अग्रवाल हे ६११ मतांनी विजयी झाले आहेत.सलग तिसऱ्या वेळी जनतेने भाजपच्या ताब्यात नगरपंचायत दिली आहे एक वेळ ग्रामपंचायत व आता सलग दुसऱ्यांदा नगरपंचायत मध्ये भाजपने आपली सत्ता अबाधित ठेवलीआहे. वार्ड क्र.१.भिसे नितीन रामदास.. (अपक्ष)… ३३७ मते वार्ड क्र.२…निकम उज्वल देविदास,.. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) कॉंग्रेस..३६१ मते वार्ड. क्र.३.सय्यद कलीम सलीम.. राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ) कॉंग्रेस… २०७ मते वार्ड. क्र. ४.धनगर जागृती श्रीराम.. राष्ट्रवादी ( शरद चंद्र पवार)३४६ मते वार्ड क्र.५तांबोळी मिनाजबी तैसिफ. अपक्ष(भाजपा पुरस्कत )५७४ मते वार्ड क्र.६पाटील प्रियंका अभिजीत ( भाजपा )३७२ मते वार्ड. क्र.७जैन धिरज रमेश. (भाजपा)४३४ मते वार्ड क्र.८चौधरी कल्पनाबाई रमेशअपक्ष… बिनविरोध वार्ड.९.बारी मनिषा शैलेश..( भाजपा)३८६ मते वार्ड. क्र. १०पाटील बेबी तुकाराम ( भाजपा )३०७ मते वार्ड क्र ११बारी सुनिल रतन.. (भाजपा )५९९ मते वार्ड क्र १ २गरुड अश्विनी प्रविण..राष्ट्रवादी ( शरद चंद्र पवार ) कॉंग्रेस..५७५ मते वार्ड क्र. १३गरुड अंबरिश काशिनाथ ( क्रॉग्रेस )३३३ मते वार्ड क्र. १४शेख उजमा शरीफोद्दीन.. कॉंग्रेस७३५ मते वार्ड. क्र १५भिल जया सुनिल.. भाजपा५५१ मते वार्ड क्र.१६बारी शरद बाबूराव…..भाजपा५०१ मते : वार्ड.१७बारी अतुल प्रल्हाद..भाजपा ४२५ मते

Read More

पाळधी गावात मध्यरात्री दुचाकी चोरी व घरफोडीची घटना;पहूर पोलिसांकडून तपास सुरू.गावातील तिसरा डोळा ठरतोय का शोपिस,नागरिकांमध्ये चर्चा.

पाळधी –  गावात मध्यरात्री दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये काहीशी दहशत निर्माण झाली आहे. राजेंद्र सुभाष परदेशी (रा. पाळधी ता. जामनेर) यांनी आपली युनिकान दुचाकी क्रमांक MH 19 EC 6474 ही दिनांक ०२/१२/२०२७ रोजी संध्याकाळी सुमारे ५ वाजता घरासमोर लॉक करून उभी केली होती. परंतु अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेल्याची तक्रार त्यांनी पहूर पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली आहे. दरम्यान, नितीन भास्कर माळी (रा. पाळधी) हे पुण्यात कामानिमित्त गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील वस्तूंची नासधूस केली असून काय चोरीस गेले आहे याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. या दोन्ही गुन्ह्यांचा पहूर पोलीस ठाण्याकडून समांतर तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पुढील तपास सुरू आहे.

Read More

तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकांचा पीककर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा,तर बँकांकडून पीककर्ज थकलेल्या शेतकऱ्यांचे बचत खात्याला होल्ड.

जामनेर तालुक्यातील शेतकऱ्याना पीककर्ज भरण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून तगादा लावण्यात येत आहे.तर बँकांनी पीककर्ज थकीत शेतकऱ्यांच्या बचत खात्याला होल्ड लावला आहे. एकीकडे पूर परिस्थितीमुळे हाताचे पिक वाया गेले आहे तर दुसरीकडे जेमतेम उत्पन्न शेतकऱ्याच्या घरात येण्यास सुरुवात झाली आहे.तर पिक मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक टंचाईत सापडला आहे.या सर्व गोष्टींचा परिणाम कमी की काय म्हणून राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्ज न भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बचत खात्याला होल्ड लावला आहे. शासनाने पीककर्ज वसुली साठी तगादा लावू नये असे आदेश असताना देखील मात्र राष्ट्रीयकृत बँकांना यांची काही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे.तरी राज्यातील शासनाने या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन याकडे बँकांना सक्त आदेश देऊन याबाबत कठोर कारवाई बँकावर करण्यात यावी ही मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Read More

सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय जामनेर येथे संविधान दिन उत्साहात साजरा.

जामनेर (प्रतिनिधी) दि. २६-११-२०२५ रोजी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय जामनेर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालायातील विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.चित्रा परदेशी मैडम यांनी केले.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रा.आय.एम.चोरडिया सर हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले.यानंतर प्रा.प्राची पाटील मैडम यांच्यासह सर्व प्राध्यापक व विद्यार्थिनी यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे सामूहिक वाचन केले.यावेळी प्रा.चोरडिया सर यांनी संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन प्रा.रूपाली लोहार मैडम व कल्याणी सरताळे मैडम यांनी केला.

Read More

मालेगाव मधील बलात्कार घटने प्रकरणी लोहारा गाव कडकडीत बंद.आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.. अशा घोषणांनी लोहारा परिसर दणाणला.

प्रतिनिधीलोहारा तालुका पाचोरा येथे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील तीन वर्ष चिमुरडीवर झालेल्या अत्याचारा प्रकरणी आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत लोहारा मार्केट पूर्ण दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आला होता या बंदला गावातील व्यापारी, तरुण, तरुणी, नागरिक महिला यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. नाशिकच्या मालेगावमधील एका 3 वर्षांच्या चिमुरडीच्या हत्या प्रकरणानं अवघा महाराष्ट्र हादरला आहे. सकाळी 9:00 वाजता लोहारा बस स्टॅन्ड परिसरापासून गावातून मुलींनी हातात निषेध नोंदवणारे पोस्टर घेऊन रॅली काढून आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या.आरोपीचा फोटो पेटवण्यात आला व त्याला असाच उभा पेटवा असा मानस व्यक्त केला. या रॅलीमध्ये सामाजिक कार्यकर्ते, तरुण तरुणी पुरुष महिला, पत्रकार बांधव उपस्थित होते.

Read More

चिमुकल्या ‘यज्ञा ‘ वर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे

पहूर येथे संतप्त शालेय विद्यार्थ्यांनी पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन पहूर ता जामनेर मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे यज्ञा जगदीश दुसाने या चिमुकलीवर अमानवी अत्याचारानंतर तिची निर्घृण हत्या करणाऱ्या विजय संजय खैरनार या नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, या तीव्र मागणीसाठी आज शुक्रवार दिनांक २१ / ११ / २०२५ रोजी पहूर येथे शालेय विद्यार्थ्यांनी मूक मोर्चा काढून निषेध नोंदविला . छत्रपती शिवाजी महाराज चौकात दादासाहेब कॅप्टन एम . आर .लेले पहूर बस स्थानक येथून होणार मोर्चास प्रारंभ झाला .आर . टी लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय आणि आर . बी .आर . माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्रित येऊन पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांना लेखी निवेदन दिले .याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे , उपसरपंच राजू जाधव , आर .बी .आर .कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर महाजन , सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या पर्यवेक्षिका कल्पना बनकर हरिभाऊ राऊत शंकर भमेरे यांनी संतप्त भावना व्यक्त करून आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली .याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते , आर . टी . लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक मधुकर आगारे , माजी सरपंच शंकर जाधव , ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे , तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अर्जुन लहासे , सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष गिरीश भामेरे , पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष रवींद्र लाठे , शिक्षिका विद्यादेवी भालेराव , सुनिता पाटील , माधुरी बारी , सरोजिनी वानखेडे , डी . वाय . गोरे , बी . एन . जाधव , चंदेश सागर , नितीन पवार , अजय पाटील, दीपक पाटील हिरालाल भामेरे चंद्रकांत सोनार भरत सोनार , रतन सोनार , गजानन सोनार , जितेंद्र सोनार , चेतन रोकडे , तुषार बनकर , राहुल ढेंगाळे यांच्यासह संताप्त पहुरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Read More

भारतीय जैन संघटनेतर्फे जामनेरला बालकांसाठी विविध कार्यक्रम संपन्न

( जामनेर -प्रतिनिधी )- येथील भारतीय जैन संघटनेतर्फे बाल दिनानिमित्त पाच वर्षापासून ते वीस वर्षापर्यंतच्या बालकांसाठी महावीर भवन येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन बाल दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात बालकांसाठी खो-खो,संगीत खुर्ची,रस्सीखेच,पास कप खेळांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धाही ठेवण्यात आल्या होत्या या स्पर्धेत 115 बालकांनी सहभाग नोंदविला. ज्या मुलांनी स्पर्धेत विजय मिळवला त्यांना बक्षिसे देण्यात आली. राकेश हिरालालजी संचेती हे प्रायोजक म्हणून होते.जळगाव जिल्हा महिला विंग जिल्हाध्यक्षा सोनल कोठारी यांनी सुत्रसंचलन केले. खानदेश विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत, जिल्हा उपाध्यक्ष विकास कोठारी, माजी जिल्हा कार्याध्यक्ष शितल लोढा, जय बोहरा, रितेश कोठारी, विशाल ओस्तवाल एवं बीजेएस महिला अध्यक्षा सौ. मोना चोरडीया, सदस्या सौं जयश्री लोढा, सौ. सोनाली सिसोदीया, महावीर पाठशाळा प्राध्यापक सौ. वनमाला कोठारी, सौ वैशाली बागमार, सौ. सपना ब्रम्हेचा, सौ. ऊषा पोरवाल, सौ. रोशनी भंडारी, सौ.शितल संचेती, सौ. नमिता चोपडा,आदी पदाधीकारी उपस्थित होते. प्रोजेक्ट हेड म्हणून विकास ललवाणी, सौ दिपाली चोरडिया यांनी काम पाहीले.

Read More

भारतीय जैन संघटनेतर्फे जामनेरला बालकांसाठी विविध कार्यक्रम संपन्न

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेर( जामनेर -प्रतिनिधी )- येथील भारतीय जैन संघटनेतर्फे बाल दिनानिमित्त पाच वर्षापासून ते वीस वर्षापर्यंतच्या बालकांसाठी महावीर भवन येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन बाल दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात बालकांसाठी खो-खो,संगीत खुर्ची,रस्सीखेच,पास कप खेळांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धाही ठेवण्यात आल्या होत्या या स्पर्धेत 115 बालकांनी सहभाग नोंदविला. ज्या मुलांनी स्पर्धेत विजय मिळवला त्यांना बक्षिसे देण्यात आली. राकेश हिरालालजी संचेती हे प्रायोजक म्हणून होते.जळगाव जिल्हा महिला विंग जिल्हाध्यक्षा सोनल कोठारी यांनी सुत्रसंचलन केले. खानदेश विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत, जिल्हा उपाध्यक्ष विकास कोठारी, माजी जिल्हा कार्याध्यक्ष शितल लोढा, जय बोहरा, रितेश कोठारी, विशाल ओस्तवाल एवं बीजेएस महिला अध्यक्षा सौ. मोना चोरडीया, सदस्या सौं जयश्री लोढा, सौ. सोनाली सिसोदीया, महावीर पाठशाळा प्राध्यापक सौ. वनमाला कोठारी, सौ वैशाली बागमार, सौ. सपना ब्रम्हेचा, सौ. ऊषा पोरवाल, सौ. रोशनी भंडारी, सौ.शितल संचेती, सौ. नमिता चोपडा,आदी पदाधीकारी उपस्थित होते. प्रोजेक्ट हेड म्हणून विकास ललवाणी, सौ दिपाली चोरडिया यांनी काम पाहीले.

Read More

भागदारा येथील २५ वर्षीय तरुणाचा अपघात जागीच मूत्यू….

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर तालुक्यातील कोदोली रस्त्यावर डांगी फॉर्मजवळ आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात जीवन जगन्नाथ चव्हाण (जोगी), वय २५, रा. भागदारा या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. होंडा लिओ मोटरसायकल व रिक्षाची जोरदार धडक होऊन हा अपघात घडला.मिळालेल्या माहितीनुसार, जीवन चव्हाण हे व्यवसायाने सेंटिंग कामगार होते. त्यांचे आई-वडील दोघेही हयात नाहीत. त्यांच्या मागे पत्नी, ४ वर्षांचा मुलगा आणि ३ वर्षांची मुलगी असा कुटुंबाचा आधार असलेली दोन लहान मुले आहेत. अचानकच आलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.धडकेत डोक्याला गंभीर मार बसल्याने जीवन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. विवाहित असून कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.स्थानिक नागरिकांकडून शासनाने या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.या अपघातामुळे भागदारा परिसरात शोककळा पसरली आहे.

Read More

उज्वला दिपक तायडे यांची बिनविरोध नगरसेवक पदी निवड,भाजपाची 27-0 च्या दिशेने वाटचाल

जामनेर (प्रतिनिधी) जामनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी आज संपन्न झाली या छाननेत वार्ड क्रमांक 11 ब च्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार उज्वला दीपक तायडे या बिनविरोध झाले आहेत त्यांच्या विरोधातील मंगला – भगवान खोडपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता उमेदवारी अर्जतील प्रतिज्ञापत्र चूक असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननी दरम्यान बाद ठरवला आहे. यामुळे मंत्री गिरीश महाजन यांचे स्वियसहाय्यक दीपक तायडे यांच्या सौभाग्यवती उज्वला दीपक तायडे या बिनविरोध निवड झाल्याची घोषणा याप्रसंगी करण्यात आली.बिनविरोध झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मतदाना आधीच नगरसेवक पदाचे पहिले खाते उघडले आणि यामुळे सर्वत्र जामनेर तालुक्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी तसेच जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांनी उज्वला दीपक तायडे यांना पुष्पगुच्छ दिले तर भाजपा पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेसमोर फटाके फोडत पुष्पगुच्छ देत विजयी उमेदवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Read More
error: Don't Try To Copy !!